Kiwi Farming in India : शेतकरी मित्रांनो किवी हे फळ आपल्या देशात परदेशी फळ म्हणून ओळखले जात आहे. परंतु आता आपल्या भारत देशामध्ये सुद्धा या फळाची यशस्वी लागवड होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषता म्हणजे डोंगराळ भागात तसेच समशीतोष्ण हवामानात या फळाची लागवड उत्तम प्रकारे होऊ शकते. किवी हे फळ पोषणमूल्यांनी परिपूर्ण आहे. या फळाची मागणी भारतात तसेच परदेशात ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनी या फळाची लागवड केल्यास नव्या आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. किवी या फळा विषयी असणारी माहिती आम्ही आपणास पुढे देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया या फळाची वैशिष्ट्ये आणि बरेच काही..Kiwi Farming in India
किवी या फळाची वैशिष्ट्ये
किवी हे फळ विशेषता अंडाकृती असल्याची दिसून येते. या फळाचा रंग हिरवा व सोनेरी असून त्यावरती मऊ केसाळ कवच दिसून येते. किवी या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. यांचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
महाराष्ट्रात किती लागवडीची शक्यता
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यता सातारा, पुणे, नाशिक तसेच कोकणाच्या काही भागांमध्ये किवी फळाची लागवड करणे शक्य आहे. या भागांमध्ये थंड व समशीतोष्ण हवामान असल्याने किवी फळांना योग्य वातावरण मिळू शकते.
किवीची लागवड करण्यासाठी हवामान आणि जमीन
- हवामानात : किवी या फळास समशीतोष्ण हवामान आवश्यक असते. थंड हवामानात या फळाचे उत्पादन चांगले मिळते. तापमान जर 35°c पेक्षा जास्त असेल तर या झाडांना त्रास होतो.
- जमीन : किवी लागवडीसाठी जमीन ही सुपिक व उत्तम निचरा होणारी हवी. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असावे. मातीचा पीएच 6 ते 6.5 दरम्यान असावा. अशा जमिनीमध्ये आपण उत्तम प्रकारे किवी या फळाचे उत्पन्न घेऊ शकतो.
लागवडीसाठी लागणारे साहित्य
- किवीची रोपे : या फळाच्या लागवडीसाठी उच्च दर्जाची रोपे निवडणे हे अत्यंत आवश्यक आहे.हॅयवर्ड, मोंटी आणि ब्रुनो ही वाण भारतात लोकप्रिय आहेत.
- खताचे व्यवस्थापन : रोपांची लागवड करत असताना सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) यांची संतुलित प्रमाण झाडांच्या विकासासाठी फायदेशीर ठरते.
- पाण्याचे व्यवस्थापन : किवीच्या झाडांना नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे. आपण जर ड्रीप सिंचन प्रणालीचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. तसेच झाडांना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळू शकते.

रोपांची लागण कशी करावी?
- लागण तयारी : शेतकरी मित्रांनो लागण करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून तयार करावी. त्यानंतर जमिनीमध्ये सेंद्रिय खते मिक्स करावित.
- झाडांची लागण : किवीची रोपे साधारण 04 मीटर अंतरावर लावावीत.
- आधार प्रणाली : रोपण आधार देण्यासाठी ट्रेलिस प्रणालीचा वापर करावा. यामुळे रोपांची वाढ चांगली होते. फळे ही सुलभतेने काढता येतात.
- छाटणी : टीव्हीच्या झाडांची योग्य छाटणी केल्यास उत्पन्न चांगले मिळते.
किवीच्या रोपांची काळजी कशी घ्यावी?
- पाण्याचे व्यवस्थापन : फळांच्या पोचण्यासाठी नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे. परंतु पाणी साचू देऊ नये.
- खत आणि सिंचन व्यवस्थापन : लागवडीनंतर साधारण दोन ते तीन वर्षापर्यंत रोपांना अधिक खत आणि पाणी आवश्यक असते.
- रोग आणि कीड नियंत्रण : किवीच्या रोपांवर थ्रिप्स, माइट्स आणि फळ माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जैविक उपायांद्वारे कीड नियंत्रण फायदेशीर ठरू शकते.
हे पण नक्की वाचा : भाजीपाला शेतीतून लाखोंची कमाई! यशस्वी शेतकऱ्यांची प्रेरणादायक कथा; Cauliflower Cultivation
फळांपासून मिळणारा नफा व उत्पन्न
किवी फळाची उत्पन्न लागवडीनंतर 3 ते 4 वर्षांनी सुरू होते. दरवर्षी एका झाडास 50 ते 100 ग्रॅम फळे मिळू शकतात. बाजारामध्ये या फळाची किंमत प्रति किलो 300 ते 400 रुपये इतकी असते. या फळांमुळे शेतकऱ्यांना चांगली उत्पन्न मिळू शकते आणि फायदाही होऊ शकतो.
किवीचे मार्केटिंग
- स्थानिक बाजारपेठा : स्थानिक बाजारपेठांमध्ये किवी फळे विकून चांगला फायदा मिळवता येतो.
- प्रक्रिया उद्योग : या फळांचा उपयोग ज्यूस,स्क्वॅश,जॅम आणि ड्रायफूट्स् तयार करण्यासाठी केला जातो.
- किवी फळाचे निर्यात : चांगल्या दर्जाचे किवी प्रदेशात निर्यात केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला
- किवी लागवड करण्यापूर्वी तज्ञांशी सल्लामसलत करा.
- रोपे खरेदी करताना प्रमाणित वाण निवडा.
- सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या, यामुळे फळांची गुणवत्ता सुधारेल.
- शासनाच्या कृषी योजना आणि सबसिडींचा लाभ घ्या.
निष्कर्ष
किवी लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय ठरू शकतो. योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनत केल्यास किवी फळ शेतीतून अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळवता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून किवी लागवडीसाठी पुढाकार घ्यावा.
मित्रांनो Kiwi Farming in India ही माहिती आपणास जर आवडली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद!