Ladki Bahin Yojana 10th Installment Out : लाडकी बहिण योजनेत सहभागी झालेल्या सुमारे 2 कोटी 41 लाख महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आता लवकरच खात्यात जमा होणार आहे. पुढील 24 ते 48 तासांच्या आत लाभार्थींना ₹1500 मिळतील. ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना एकत्रित ₹4500 इतकी रक्कम दिली जाईल.
आपण माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी असाल आणि दहावी हप्ता कोणाला आणि केव्हा मिळणार याची माहिती हवी असेल, तर ही माहिती आपल्या उपयोगाची ठरेल. या लेखात दहावा हप्ता कोणत्या महिलांना मिळेल, त्याची स्थिती कशी तपासावी आणि लाभार्थी यादी कशी पाहावी याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहिण योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरत आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम भविष्यात ₹2100 पर्यंत वाढवण्याची तयारी आहे. आतापर्यंत 9 हप्त्यांचा लाभ देण्यात आला असून, दहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
लाडकी बहिण योजनेच्या दहाव्या हप्त्यासाठी पात्रता काय?
लाडकी बहिण योजनेच्या दहाव्या हप्त्यासाठी पात्रता ठरवताना काही महत्त्वाचे निकष ठेवले गेले आहेत. महिला महाराष्ट्राची स्थायी रहिवासी असावी आणि तिचे वय 18 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात शासकीय नोकरदार, आयकर भरणारे सदस्य किंवा ट्रॅक्टरशिवाय इतर चारचाकी वाहन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावी आणि बँक खात्यात डीबीटी सक्रिय असणे बंधनकारक आहे.
Ladki Bahin Yojana 10th Installment लिस्ट कशी पहावी?
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्य पृष्ठावर दिलेल्या “अर्जदार लॉगिन” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेजवर आपला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- त्यानंतर “Application Made Earlier” या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर “Application Status” वर क्लिक करा.
- स्टेटसमध्ये जर “Approved” असं लिहिलेलं असेल, तर तुम्हाला दहावा हप्ता मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana 10th Installment पेमेंट स्टेटस कसा तपासायचा?
- सर्वप्रथम माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवरील “अर्जदार लॉगिन” या पर्यायावर क्लिक करा.
- आपली लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर “भुगतान स्थिति” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेजवर आपला अर्ज क्रमांक आणि Captcha Code टाका.
- त्यानंतर “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर दहाव्या हप्त्याचा पेमेंट स्टेटस दिसून येईल.