Maharashtra SSC HSC Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा मार्च महिन्यात पार पडल्या असून आता संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. शिक्षण मंडळ लवकरच अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.
Maharashtra SSC HSC Board Result 2025
महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच एचएससी (बारावी) आणि एसएससी (दहावी) चा निकाल जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाने स्पष्ट केले आहे की दोन्ही वर्गांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून निकाल तयार करण्याचे अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी काही मीडिया अहवालांनुसार, बारावीचा निकाल 6 मे 2025 रोजी आणि दहावीचा निकाल 15 मे 2025 रोजी जाहीर होऊ शकतो.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल खालील संकेतस्थळांवर पाहू शकतात
https://www.mahahsscboard.in, https://mahresult.nic.in, https://sscresult.mkcl.org, https://hscresult.org. निकाल उपलब्ध होताच संबंधित लिंक सक्रिय केली जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी आपला रोल नंबर व आवश्यक माहिती टाकून विषयानुसार गुण पाहू शकतील. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी एमएसबीएसएचएसईचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे की निकाल 15 मे पर्यंत प्रसिद्ध केले जातील.Maharashtra Board Result 2025
महाराष्ट्रात यंदा दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 17 मार्चपर्यंत पार पडली, तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेण्यात आली. यंदाच्या एचएससी परीक्षेत 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये 8,10,348 मुलं, 6,94,652 मुली आणि 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता.